
पुणे शहरातील खुनाच्या प्रयत्नातील आरोपींच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात खुनाच्या प्रयत्नातील आणि दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील तसेच चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ५३/२०२३, भादंवि कलम ३०७,३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४(२५), मुं.पो.का. ३७(१)(३) सह १३५ या गुन्हयातील दिड वर्षांपासून पाहिजे आरोपी
१) हरिष उर्फ हरि रविंद्र सावळे (वय २३ वर्षे, रा. ब्लुबेल सोसायटी शेजारील आकाश रणपिसे यांची पत्र्याची जयहिंद चौक, सुतारवाडी, पाषाण, पुणे),
२) सनी राजेश गुजराती (वय- २२ वर्षे, रा. मुळपत्ता- खड्डा झोपडपट्टी, शिवाजीनगर, पुणे व सध्या रा. दत्तकृपा वॉशिंग सेंटर शेजारी, दांगट चाळ, सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांचा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सपोनि प्रविण काळुखे व स्टाफ पो.हवा. २०६१ प्रदीप राठोड, पोहवा ५४५ बाळू गायकवाड, पोहवा ६९२९ गणेश ढगे, पो.शि.८७७० अमित गद्रे, पोशि ८७४२ महेश पाटील व पोशि ८७३२ साईकुमार कारके असे शोध घेत असताना स्टाफमधील पोलिस शिपाई ८७७० अमित गद्रे यांना वरील गुन्हयातील पाहिजे आरोपी
१) हरिष उर्फ हरि रविंद्र सावळे हा ओंकारेश्वर मंदीराजवळ मुठा नदीपात्रात, डेक्कन, पुणे व
२) सनी राजेश गुजराती हा दांगट वॉशिंग सेंटर, पाषाण, पुणे येथे येणार असलेबाबतची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाकडील सपोनि प्रविण काळुखे व वरील स्टाफ असे सापळा रचून दिड वर्षापासुन वरील नमुद गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी नामे १) हरिष उर्फ हरि रविंद्र सावळे, सनी राजेश गुजराती यांना शिताफीने पकडून त्यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. सदर आरोपींना पुढील कारवाईकरीता चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), निखिल पिंगळे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे १) व नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस शिपाई अमित गद्रे, पोलिस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, गणेश गोसावी, महेश पाटील, साईकुमार कारके, रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, मनिषा पुकाळे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…
मुलीच्या नावे चॅटिंग! युवकावर कोयत्याने हल्ला करणारे दोन तासात जेरबंद…
पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…

