
मुलीच्या नावे चॅटिंग! युवकावर कोयत्याने हल्ला करणारे दोन तासात जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर भर दिवसा एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी अल्पवयीन आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हवेली पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण, गुन्हा रजि नं २०९/२०२४, भारतीय न्याय संहिता १०९,३५१ (२)(३) आर्म अॅक्ट ४ (२५) मधील पाहिजे आरोपींचा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे व अंमलदार पोहवा २०६१ प्रदीप राठोड, पोहवा २८८ धनंजय ताजणे, पोहवा ६९२९ गणेश ढगे, पो.अं. ८७३२ साईकुमार कारके असे शोध घेत होते. स्टाफमधील पोलिस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना सी.सी.टि.व्ही. फुटेजच्या आधारे व त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील जखमी युवकावर वार केले आहेत ते दोन जण हे खेडकर लेन मधील बंद पडलेल्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये, न-हे, पुणे येथे उभे असून त्यातील एकाने काळया रंगाचे फुल बाह्यांचे हुडी जॅकेट व राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट व दुसऱ्याने शेवाळे रंगाचे फुल बाह्यांचे हुडी जॅकेट व फिक्कट निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती.
सदरबाबत आम्ही वपोनि नंदकुमार बिडवई सो व सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना कळविले असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले होते. प्राप्त बातमीचे अनुषंगाने सपोनि काळुखे व नमुद स्टाफ असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावून वरील पाहिजे आरोपींचा शोध घेतला आणि शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी १) हर्षद संदीप वांजळे (वय- १८ वर्षे, रा. औंदुबर कॉलनी, लेन नं अ, वारजे जकात नाका, वारजे, पुणे) असे नाव सांगितले व २) ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आरोपींना पुढील कारवाईकरीता हवेली पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, पोलिस नाईक रविंद्र लोखंडे, पोलिस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

मुलीच्या नावे चॅटिंग! पुणे शहरात रस्त्यात भर दिवसा पाठलाग करून कोयत्याने हल्ला…
दरम्यान, पुणे शहरातील डहाणूकर कॉलनी परिसरात मे महिन्यात एकमेकांकडे बघितल्यावरून वाद झाला होता. तेव्हा एका युवकावर कोयत्याने वार करण्यात आला होता. या हल्ल्यात श्रीनिवास वतसलवार या युवकाचा मृत्यू झाला होता. युवकावर हल्ला करणाऱ्यांपैकी सागर चव्हाण हा एक होता. सागर चव्हाण याने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.
सागर चव्हाण याला एका मित्राने बोलावल्यामुळे तो किरकटवाडी भागात आला होता. भररस्त्यात त्याचा पाठलाग करण्यात आला. कोयता घेऊन हल्लेखोर त्याच्या मागे लागले होते. कोयत्याचा वार लागल्यानंतर तो रस्त्यात पडला. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर सलग अनेक वार केले. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असतानाही त्याच्यावर वार केले गेले. जखमी असलेल्या सागरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार केले जात आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
मुलीच्या नावे महिनाभर चॅटिंग…
आरोपींनी इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाउंट बनवले. त्यानंतर सागर चव्हाण याच्या सोबत मैत्री केली. जवळपास महिनाभर सागरसोबत मुलीच्या नावे चॅटिंग केली. त्यानंतर आज सकाळी सागरला भेटायला बोलावले. जेव्हा सागर निश्चित स्थळी भेटायला आला तेव्हा त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. किरकटवाडी फाटा येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…पुणे शहरात खूनसत्र थांबेना; युवकाची मध्यरात्री हत्या…
पुण्यात डंपरने मोटारीला धडक दिल्याने पिता-पुत्राचा मृत्यू…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

