
पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…
पुणे: लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या केल्यानंतर मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षात टाकून प्रियकर फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिवानी सुपेकर (वय २६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते, त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले होते. गेली दोन वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आळवून हत्या केली. मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला. आज (बुधवार) सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचे दिसले. पण, पुढे ती मृत पावल्याचे लक्षात आले. वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. ही हत्या प्रियकर विनायकने केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचले आहेत. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वीच अली अन्सारीची दगडाने ठेचून हत्या झाली होती. आता या महिलेचा हत्या झाल्यामुळे ऐन गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…
पुणे हादरले! गरोदर प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् पुढे…
प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…
पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

