पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या पथकाने वेशांतर करून आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): सात वर्षांपासून नाव बदलून वेगवेगळया शहरांमध्ये राहत असलेला खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील तसेच चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर कडील गुन्हा रजि नं ४८२/२०१७, भादंवि कलम ३०२,३०७,५०४ या गुन्हयातील फरार आरोपी सुनिल लक्ष्मण पवार (रा. लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे) हा गुन्हा केल्यापासून गेल्या ७ वर्षे तो फरार होता. न्यायालयाने त्याचे अटकेबाबत स्टँडींग वॉरंट काढुन सुध्दा तो न्यायालयात हजर झाला नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यास फरार घोषित केले होते.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोहवा ५४५ बाळू गायकवाड व पोशि ८७४२ महेश पाटील यांना वरील गुन्हयातील व न्यायालयाने घोषित केलेला फरार असलेला आरोपी सुनिल लक्ष्मण पवार हा मांडवी पाडा, काशिगाव, ता, जि. ठाणे येथे स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार इकडील पथकाकडील सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोहवा गायकवाड, पोशि महेश पाटील व पोशि साईकुमार कारके असे मांडवी पाडा, काशिगाव, ता. जि. ठाणे येथे वेशांतर करुन सापळा रचून ०७ वर्षापासुन भादंवि कलम ३०२, ३०७,५०४ या गुन्हयात फरारी असलेला आरोपी सुनिल लक्ष्मण पवार (वय ३४, रा. सोमनाथ मंडळाजवळ, लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे) हा पळून जात असताना त्यास पाठलाग करुन शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले.

आरोपीकडे चौकशी करता तो यापुर्वी छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव असे वेगवेगळया ठिकाणी स्वतःचे नाव बदलून रहात असलेबाबत सांगितले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), निखिल पिंगळे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे); गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे १) व श्री. नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस हवालदार बाळु गायकवाड, पोलिस अंमलदार महेश पाटील, साईकुमार कारके, पोलिस हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, पोलिस नाईक रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, गणेश गोसावी, अमित गद्रे, नारायण बनकर, महिला पो.हवा. मनिषा पुकाळे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

मुलीच्या नावे चॅटिंग! युवकावर कोयत्याने हल्ला करणारे दोन तासात जेरबंद…

पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!