पुणे शहरात मद्यधुंद चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं…

पुणे: पुणे शहरातील पौडफाटा परिसरात रविवारी (ता. ८) रात्री एका टेम्पो चालकाने श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. टेम्पो चालक दारुच्या नशेत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा अपघात घडला. टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत जात होता. त्याचा टेम्पो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवार याने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. यामध्ये गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आशिष पवार याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

pune-accident
आशिष पवार या टेम्पो चालकाने करिश्मा चौकातील सिग्नलला दोन लहान मुलांना उडवले. त्याने टेम्पो तसाच पुढे नेला आणि काही गाड्यांच्या अंगावर वाहन नेले. त्यानंतर पौड फाटा येथे सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडत दोन स्कुटींना धडक दिली. यानंतर टेम्पो चालकाने एका कारला धडक दिली.

करिश्मा चौकापासून मद्यधुंद टेम्पो चालक आशिष पवार हा सात ते आठ जणांना उडवत आला. त्यानंतर सावरकर उड्डाण पुलाखाली तीन जणांना उडवले. टेम्पो चालवताना देखील आशिष पवार याचे डोळे मिटत होते. या घटनेनंतर जमावाने टेम्पो चालकाला खाली उतरवत मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आशिष पवार याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

हिट अँड रन! BMWच्या धडकेत युवकाचा मृत्यू; आरोपीला अटक…

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!