पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

पुणेः महिलेचा विनयभंग करणा-या अनोळखी आरोपीस पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिवाजीनगर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं १३१/२०२३ भादवि क-३५४ मधील पीडित महिला या ०२/०७/२०२३ रोजी रात्री २२/०० वाजेच्या सुमारास तिचे घरी शिवाजीनगर मनपा ब्रिजचे खालून बावधन बसचे स्टॉपकडे पायी जात होत्या. अंधारात खुडे चौकाकडून मनपा ब्रीजच्या दिशेने समोरुन एक अनोळखी इसम अंगावर आला व त्याने फिर्यादिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे.

गुन्ह्याच्या तपासाबाबत वरिष्ठ पोलिस निराक्षक अरविंद माने यांनी पोलिस आयुक्तांनी महिलांवरील होणारे अत्याचार व छेडछाड बाबत दाखल होणारे गुन्ह्यांच्या तपासाबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास करणेबाबत तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक साळवे, पोलिस हवालदार रणजित फडतरे, व पोलिस हवालदार बशीर सय्यद, पोलिस हवालदार रुपेश वाघमारे, पोलिस शिपाई आदेश चलवादी असे मनपा ब्रीज येथे गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून रोज रात्री २०/०० ते २४/०० वाजेपर्यंत सापळा रचून लक्ष ठेवत होते.

पोलिस हवालदार रणजित फडतरे यांनी सीसीटिव्ही फुटेज तपास असता फुटेज नुसार आमचे गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, सदर व्यक्ती हा मनपा पुलाखाली थांबलेला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोलिस स्टेशनचे पथक पाठवले. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफिने त्यास ताब्यात घेतले व अधिक चौकशीकामी पोलिस स्टेशन येथे आणले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण तुकाराम घोडे (वय ४५, रा रामनगर, वारजे
माळवाडी, पुणे) असे सांगितले. दाखल गुन्हाबाबत अधिक चौकशी केले असता सदरचा गुन्हा हा त्यानेच केल्याचे कबुल केले.

सदरची कामगिरी प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, संदिपसिंह गिल्ल, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- १, रमेश कुंवर, सहा पोलिस आयुक्त, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड, तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक प्रताप साळवे, मपोउपनि मनिषा जाघव, पोलिस हवालदार रणजित फडतरे व पोलिस हवालदार बशीर सय्यद, पोलिस हवालदार रुपेश वाघमारे, पोलिस शिपाई आदेश चलवादी यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!