
पंतप्रधान दौरा! पुणे शहराच्या मध्यभागातील वाहतूक बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुणे दौऱ्यावर आहेत. एसपी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. यासाठी पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौकात आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवर लाकडी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे.
असे असतील वाहतुकीत बदल
पुणे शहरातील सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी भागातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद
वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगडरस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे.
बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद.वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जॉगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.
मध्यभागातील वाहतूक बदल
टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
गरुड गणपती चैाक ते भिडे पूल चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.
वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकातून वळून केळकर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
नो पार्किंग झोन
संध्याकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत जंगली महाराज रस्ता … शास्त्री रोड.. फर्ग्युसन रस्ताटिळक रोड ..या मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहने लागण्यास मनाई करण्यात आली आहे.
दिनांक 12.11.2024 रोजी मा.व्ही. व्ही.आय.पी यांचा पुणे दौरा असल्यामुळे खालील नमूद रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे…. pic.twitter.com/VS7NelfPZW
— पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) November 11, 2024
पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात फॉर्च्युनर गाडीमधील रोकड जप्त…
पुणे शहरात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह…
पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…
पुणे शहरात आणखी एका कारमध्ये सापडले लाखो रुपये…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

