
विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…
नवी दिल्ली: एका बांधकाम व्यावसायिकाकडे स्वयंपाक करणाऱ्या महिलेने तिची लघवी मिसळून स्वयंपाक करत होती. जेव्हा संपूर्ण कुटुंब आजारी पडलं, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. संबंधित घटनेचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडे घरकाम करणारी महिला संपूर्ण कुटुंबाला तिची लघवी मिसळलेले अन्न रोज खायला देत होती. संपूर्ण कुटुंब लिव्हरच्या समस्येमुळे आजारी पडल्यावर त्यांना संशय आला. मग कुटुंबाने किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावला. या कॅमेरात घरकाम करणाऱ्या महिलेचे कृत्य कैद झाले आहे. पी़डित कुटुंबाच्या तक्रारीवरून गाझियाबाद पोलिसांनी या महिलेला अटक केली. ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून असे कृत्य करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, व्यावसायिकाच्या पत्नीने सांगितले की, ‘रीना नावाची महिला आमच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून घरकाम करते. घरातली स्वच्छता, भांडी घासण्यासह स्वयंपाकाचे कामदेखील तीच करते. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबातले सदस्य लिव्हरच्या विकाराने त्रस्त झाले. सुरुवातीला संसर्ग झाला असावा असे समजून आम्ही डॉक्टरांना दाखवले होते. पण काही फरक पडला नाही. हळूहळू संपूर्ण कुटुंब आजारी पडले. त्यामुळे आम्हाला वेगळं काही तरी असल्याचा संशय आला आणि आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावले. मग सर्व प्रकरण उघड झाले.
‘काही दिवसांपूर्वी आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर धक्काच बसला. महिला तिची लघवी मिसळलेले अन्न आमच्या कुटुंबाला खायला घालत होती. कुटुंबातले सदस्य आजारी पडल्यावर आम्हाला तिच्यावर संशय आला. काही दिवसांपूर्वी आम्ही घर आणि किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले; पण त्या महिलेला ही गोष्ट माहिती नव्हती. सोमवारी अन्न शिजवताना त्यात लघवी मिसळताना ती कॅमेरात टिपली गेली. हे पाहून आम्हाला धक्का बसला. त्यामुळे आम्ही क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. माझे कुटुंबीय रीनावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. आम्ही तिला आमच्या कुटुंबातली सदस्य मानत होतो. तिच्या प्रत्येक सुख-दुःखात आम्ही सहभागी होत होतो. यापूर्वी आमच्या घरातील महागड्या वस्तू चोरीला गेल्या होत्या; पण आम्हाला तिचा संशय आला नाही. सोमवारी सीसीटीव्हीवर तिचे कृत्य पाहिल्यावर आठ वर्षांचा विश्वास एका मिनिटात उडाला. रीनाच्या या कृत्याचा संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे,’असे व्यावसायिकाने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस त्यांच्या घरी तपासासाठी गेले. चौकशीवेळी रीनाचा व्यावसायिकाच्या पत्नीशी वाद झाला होता. चौकशी सुरू असताना सुरुवातीला महिलेने सर्व आरोप फेटाळून लावले. सीसीटीव्ही फुटेज दाखवताच तिचे बोलणे बंद झाले. महिलेला अटक केली असून, पुढची कारवाई सुरू आहे.’
ये जो तस्वीर में मुंह बांधे खड़ी है इस महिला का नाम रीना है, यह महिला ग़ाज़ियाबाद की एक कॉलोनी में एक घर में खाना बनाने का काम करती थी,
रीना जिस परिवार के यहां खाना बनाती थी उन सबको पेट और लीवर में दिक्कत हुई तो
उनका शक़ रीना पर गया, उन्होंने किचन में मोबाइल का कैमरा खोलकर रख… pic.twitter.com/9beunQP900
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) October 16, 2024
विकृती! प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करायचा अन् विकायचा फळं…
विकृती! नाशिक जिल्ह्यात भररस्त्यात गायीवर अत्याचार…
विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…
विकृती! गर्भवती बकरीवर तीन दारुड्या युवकांकडून बलात्कार…
विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

