
EVM हॅकिंगचा दावा करणाऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल…
मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) हॅक करणे शक्य आहे, असा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता तपास सुरू करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, सय्यद शुजा याने अनेक धक्कादायक दावे केले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम बनवणाऱ्या टीममध्ये आपणही होतो, असा दावा केला होता. एका विशिष्ट प्रणालीचा वापर करून ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असा दावा त्याने केला. काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी देखील या दाव्यांच्या आधारे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम आपण हॅक करू शकतो, असा दावा त्याने केला होता. आपल्याला 53 कोटी मिळाले तर आपण 63 जागांचे ईव्हीएम हॅक करू शकतो, अशी ऑफरही त्याने दिली होती. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ईव्हीएम हॅक करू शकतो असा दावा त्याने केला. अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या एका विभागात कंत्राटी तत्वावर काम करत असल्याचा दावा त्याने केला आहे.
दरम्यान, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून वायफाय किया ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कसी कनेक्ट केले जाऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. तसेच, दिल्ली पोलिसांत २०१९ मध्येही निवडणूक आयोगाने शुजाविरोधात तक्रार दाखल केली होती. शूजाने 2019 मध्ये लंडन येथे पत्रकार परिषद घेत असाच दावा केला होता.
Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…
पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…
एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी…

