प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…
पाटणा (बिहार): मामी भाच्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी घरातून पळ काढल्याची घटना भागलपूर भागात घडली होती. भाच्याच्या प्रेमापोटी ती पती आणि दोन मुलांना सोडून पळून गेली होती पण पुन्हा घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर तिने आता पती आणि मुलांसोबत राहणार असल्याचे सांगितले.
भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजच्या मिरहट्टी गावात राहणाऱ्या एका महिलेचे तिच्या भाच्यावर प्रेम होते. यानंतर भाच्याने तिला आयुष्यभर पत्नी म्हणून स्वीकारण्याचे वचन दिल्यानंतर दोघांनी चार महिन्यांपूर्वी घरातून पळ काढला होता. पतीने पत्नीला फोन करुन घरी परतण्याची विनंती केली. चार महिन्यानंतर तिला आपल्या मुलांची आठवण येऊ लागली. यानंतर ती आपल्या पतीच्या घरी परतली. घरी परतल्यानंतर तिच्या पतीने तिला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर तिला घरातही प्रवेश दिला नाही.
महिलेने पतीच्या घरासमोर मोठा गोंधळ घातला आणि फिरायला गेल्याचे सांगितले. हे माझेही घर आहे. मी कोणत्याही परिस्थितीत येथून जाणार नाही. पतीने पत्नीला परत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.