
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी तिरुपती ऊर्फ टक्या विठ्ठल लष्कर (टोळीप्रमुख) व त्याचे इतर तीन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई केली आहे.
फिर्यादी हे त्यांचे कानिफनाथ अमृततुल्य हॉटेल पीएमटी बस डेपो शेजारी, ढमाळवाडी, भेकराईनगर पुणे या त्यांच्या हॉटेलमध्ये ०१/१२/२०२३ रोजी असताना तिरुपती ऊर्फ टक्या लष्कर (रा. पापडेवस्ती व शुभम करांडे, रा. पापडेवस्ती) याने सन २०२१ मध्ये पापडे वस्ती येथे मर्डर केल्याने त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांना मदत केली असल्याचे समजुन त्यांच्या हॉटेलमध्ये येवुन त्यांच्या हॉटेलमधील खुर्च्या, टेबल फेकुन देवुन हॉटेलमधील काउंटरची काच फोडली. हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवुन फिर्यादी यांच्या अंगावर धावुन येवुन त्यांचेवर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्रे हवेत फिरवुन मी आताच मर्डरमधून बाहेर आलोय, जो कोणी माझ्याविरुध्द पोलिसांत तक्रार करेल त्याचा मी गेम करेन अशी धमकी दिली म्हणून त्यांच्याविरुध्द तक्रार आहे वगैरे मजकुराची फिर्याद दिल्याने त्यांचे फिर्यादी वरून हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १८२६ / २०२३ भादंवि कलम ४२७,३५२,३२३,५०४,५०६,३४, कलमवाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे, आर्म अॅक्ट ४ (२५) क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाचा तपासा दरम्यान सदरचा गुन्हा आरोपी
१) तिरुपती ऊर्फ टक्या विठठल लष्कर, वय २१ वर्ष रा. पापडेवस्ती पुणे. (टोळी प्रमुख)
२) शुभम सुरेश करांडे, वय २२ वर्षे, रा. पापडेवस्ती, हडपसर, पुणे
३) अथर्व रविंद्र शिंदे, वय २१ वर्षे रा. साडेसतरा नळी, हडपसर पुणे (टोळी सदस्य)
४) एक अनोळखी इसम यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झालेने दाखल गुन्हयात अ.नं. २ यास अटक करण्यात आलेली असुन इतर पाहिजे आरोपी आहेत.
यातील आरोपींनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व व दहशत रहावी म्हणुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. यातील आरोपी यांनी संघटित दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सदरबाबत प्रस्ताव तयार करुन पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे आर राजा यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन हडपसर पोलिस स्टेशन गु.र.नं. १८२६ / २०२३ भादंवि कलम ४२७,३५२,३२३,५०४,५०६,३४, कलमवाढ ३०७ सह महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम ३७ (१). (३) सह १३५ प्रमाणे आर्म अॅ. ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ अन्वये दाखल असलेल्या सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२).३ ( ४ ) चा अंतर्भाव करण्याची मा अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजन कुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर अश्वीनी राख या करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे (पोलिस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे आर. राजा सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर अश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर रविंद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, संदिप शिवले म. सहा.पो.निरी. सारिका जगताप, पोलिस उप निरीक्षक सुशिल डमरे, हडपसर पो.स्टे. निगराणी पथकातील पोलिस अंमलदार प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोगे, यांनी कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही १०५वी कारवाई आहे.

मोक्का ९९! वैभव उर्फ गोट्या तरंगे टोळीवर ‘मोक्का’…
मोक्का ९८! फहीम खान टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
मोक्का ९६! निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’
मोक्का ९५! ‘तु मोठा भाई झाला का, तुझा गेमच करतो’ म्हणणाऱ्या टोळीवर मोक्का…
मोक्का ९४! महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांवर मोक्का…
मोक्का ९०! भुरिया टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
मोक्का ८९! खडक पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीवर मोक्का…
मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…
मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

