
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्…
नाशिक : नाशिक शहरातील उपनगर भागात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या सराईत गुंडाला अटक करण्यात युनिट क्रमांक १, गुन्हे शाखेला यश आले आहे. सराईत गुंडाकडून दोन गावठी कट्टे आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सचिन ओमचंद कागडा (वय 25, रा. उपनगर मनपा हॉस्पिटल शेजारी, उपनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे.
नाशिक शहरामध्ये सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार, अंमलदार प्रदीप म्हसदे, विशाल देवरे हे गस्तीवर असताना त्यांना सराईत गुन्हेगार सचिन कागडा हा उपनगर मनपा बिल्डिंगजवळ गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सराईतास अटक केली.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
सराईत गुंडाची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, समाधान पवार आदींच्या पथकाने केली आहे.
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
नाशिकमध्ये दारू पिताना मित्राला दगडानं ठेचून मारलं; मानवी कवट्या अन् हाडं…
नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…
धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…
नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

