
पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिकाने झाडल्या व्यवसायिकावरच गोळ्या…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरामधील चिखली परिसरात व्यवसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत व्यावसायिक अजय सुनील फुले (वय 19, रा. मोहननगर, चिंचवड) हा जखमी झाला आहे. तर गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
अजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अजय आणि हर्षल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणे याने दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. सुदैवाने अजय फुले हा बचावला आहे. गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान, जखमी झालेल्या अजयचा गॅस शेगडीचा व्यवसाय आहे. गोळीबार केलेला आरोपी हर्षलचा सुद्धा तोच व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होता. त्यामुळे हर्षलने अजयला मारण्यासाठी कट रचला. शाम आणि लिलारे अजयच्या दुकानात येऊन वाद मिटवण्यासाठी गेले होते. चर्चा सुरु असतानाच हर्षल सुद्धा त्याठिकाणी आला. यावेळी हर्षलने पिस्टल काढत तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली. दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…
पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…
हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…
चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

