भीषण अपघाताचा लक्ष विचलीत करणारा Video; पाच जागीच ठार…

चेन्नई (तमिळनाडू): तिरुमंगलमजवळील शिवराकोट्टई येथे विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर भीषण अपघात झाला असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.

शिवराकोट्टई येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून घसरलेल्या कारने आधी दुभाजकाला धडक दिली आणि नंतर कार दुचाकीवर जाऊन आदळली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक कार भरधाव वेगात महामार्गावरून जात असताना दुचाकीला जोराची धडक देते. या धडकनेनंतर कार अनियंत्रित होत दुसऱ्या लेनमध्ये शिरते. कार हवेत उडेत आणि तिसऱ्या लेनमध्येही प्रवेश करते. यावेळी ती इतरही काही गाड्यांना धडक देते. अवघ्या काही सेकंदात ही भीषण दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, इतर दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोटारीमधील आर. कानगवेल (वय 62), त्यांची पत्नी कृष्णाकुमारी (वय 51), त्यांची सून नागज्योती (वय 28) आणि तिची मुलगी शिवा अथमिका (वय 8) अशी मृतांची नावे आहेत. तर जी. पांडी (52) या निलायुर येथील फळविक्रेत्याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. १०) पहाटे 6 वाजेच्या सुमारास अपघात झाला आहे.

पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…

पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!