Video News: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दोन मुली आणि एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंग नदीपात्रात 2 मुली आणि एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अवंतिका पाटील व कावेरी मुनेश्वर आणि चेतन काळबांडे अशी मृत मुलांची नावे आहेत.

पुणे शहरातील ड्रग्स प्रकरणावर संतापले पिट्याभाई
पुणे: ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणजे रमेश परदेशी नेहमी सामाजिक विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतात. सध्या पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणावर पिट्या भाई संतापले आहेत.

जालना येथून अपहरण झालेल्या मुलाची सुटका
जालना : जालना येथून श्रीहरी कृष्णा मूजमुले (वय १३) या मुलाचे शाळेत जाताना अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी काही वेळातच अरबाज शेख, राहुल गेरूवाल आणि वर्मा नावाच्या तीन अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि मुलाची सुटका केली.

फेसबुकवरील मैत्रीतून झाला विवाह आणि पुढे झाली हत्या
रांची (झारखंड): फेसबुकच्या माध्यमातून मैत्री, प्रेम आणि विवाह झालेल्या युवतीची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप आहे. या बाबत मृत युवतीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

लातूरमधील 9 विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात
लातूरः नीट पेपर घोटळा प्रकरणी लातूरमध्ये आतापर्यंत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 9 विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

बीड जिल्ह्यात ट्रकला स्विफ्टची धडक, दोघांचा जागीच मृत्यू
बीड : जिल्ह्यातील केजजवळ झालेल्या भीषण अपघात दोन जण जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त हे आंध्रप्रदेशातील असल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे शहरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
पुणे : संगनमत करून खोटे व बनावट दस्तावेज तयार करून एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये राडा
पुणे : येरवडा कारागृहात प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून तिघांनी कैदयाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोर्श अपघातातील मृत युवकाची आई संतप्त
पुणेः पुणे शहरात दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला आहे. यानंतर मृत युवकाच्या आई संतप्त झाली आहे. माझ्या मुलाचा जीव घेतला, त्याला फाशी द्या, अशी मागणी केली आहे.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!