
धक्कादायक! पहाटे झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात घातला दगड…
सांगलीः पत्नी झोपेत असतानाच पतीने घरगुती वादातून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना प्रकार मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चिकुर्डे (ता. वाळवा) येथे घडली आहे. खुनानंतर स्वत: पती पोलिस ठाण्यात हजर झाला.
कविता उत्तम बुरशे पाटील (वय ४२) असे मृत महिलेचे नाव तर संशयित उत्तम विष्णू बुरशे पाटील (वय ५२) असे पतीचे नाव आहे. कुरळप पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनील माने, राजेंद्र जाधव, दीपक खोमणे व फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला.
कविता यांचे चोवीस वर्षांपूर्वी उत्तम बुरशे पाटील याच्याशी विवाह झाला होता. उत्तम हा एका साखर कारखान्यात लॅब विभागात कामाला आहे. त्यांना एक मुलगी, मुलगा असा परिवार आहे. शिक्षणानिमित्त दोन्ही मुले बाहेरगावी आहेत. पती-पत्नीमध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते. दोन महिन्यांपूर्वी कविता या करंजवडे या त्यांच्या माहेरी निघून गेल्या होत्या. मात्र, उत्तम याने मी परत भांडण करणार नाही, असे सांगून कविता यांना मागील महिन्यात घरी घेऊन आला होता. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. यामुळे उत्तम याने मंगळवारी पहाटे कविता या झोपेत असतानाच घराबाहेरील मोठा दगड आणून डोक्यात घालून खून केला. भावकीतील काही लोकांना खून केल्याचे सांगत कुरळप पोलिसांत हजर झाला. या घटनेमुळे चिकुर्डेसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण व सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत.
धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…
पुणे जिल्ह्यात पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; सात महिन्यांची चिमुकली पोरकी…
नवऱ्याने भर बाजारात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले…
हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

