
मेहुण्याशी झालेल्या भांडणाच्या रागाचा बदला अन् चिमुकलच्या बळी…
अहमदनगर : सख्ख्या मेव्हण्याच्या 3 वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक श्रीरामपूर येथे घडली आहे. पोलिसांनी या हत्येचं गूढ उकलले असून, आरोपी राहुल बोधक याला बेड्या ठोकल्या आहेत.पत्नी नांदायला येत नाही आणि मेव्हण्याने भांडण केले या रागातून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रीरामपूरातील नायगाव येथून 6 सप्टेंबर रोजी स्नेहदीप त्रिभुवन (वय ३) या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. स्नेहदीप बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली. त्यानंतर जवळपास 5 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर गारच शिवारात पोलिसांना चिमुकल्या स्नेहदीप याचा मृतदेह सापडला. बायको नांदायला येत नाही म्हणून वैजापूर येथील राहुल बोधक हा आठ दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सासुरवाडीला आला होता. तिथे मेव्हण्याशी (बायकोच्या भावाशी) वाद झाल्यानंतर भांडणाचा राग मनात धरून आरोपीने मेव्हण्याचा 3 वर्षीय मुलगा स्नेहदिप त्रिभुवन याचे अपहरण केले होते.
पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्या नंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारच शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला. आरोपी राहुल बोधक याने स्नेहदिप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होईल. मात्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यातील खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…
धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…
हृदयद्रावक! दीड वर्षांची चिमुकली अन् सहा महिन्यांची गर्भवती…
मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्यात बुडून ठार मारले; कारण…
मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…

