वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पतीने आपल्याच गरोदर पत्नीचे लग्न आपल्या लहान भावासोबत लावून दिले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नानंतर काही महिन्यातच वहिनीचे दिरासोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते.
पत्नीचे आपल्या लहान भावासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. पण नंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या पत्नीचे लहान भावाशी लग्न लावून दिल्याची घटना जौनपूरमध्ये घडली आहे. बहादूर गौतम याचे मे 2023 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच त्याच्या पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. कुटुंबात याबाबतची माहिती समजली.
पत्नी गरोदर राहिल्यानंतर बहादूर गौतमने तिला आपल्याजवळ ठेवण्यास नकार दिला. दुसरीकडे दीर आणि वहिनी यांच्यातील प्रेम वाढत होते. शेवटी, संपूर्ण कुटुंबाने दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. दीर आणि वहिनीनीही यासाठी होकार दिला. यानंतर दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली. कल्याणपूर-जैतपूर येथील जोगीबीर मंदिरात दीर आणि वहिनीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नाच्या वेळी पती आणि त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
दरम्यान, अनोख्या लग्नाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा होत आहे. नागरिक या महिलेच्या पतीचं कौतुक करत आहेत.
पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
प्रेम! वहिनीने दिरासोबत काढला पळ अन् पुढे…
दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…
वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…
दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…
दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…