धक्कादायक! कुटुंबातील आठ जणांना झोपेत असतानाच कुऱ्हाडीने तोडले…

भोपाळ (मध्य प्रदेश) : छिंदवाडा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.

आदिवासी कुटुंबातील युवकाने आई-वडील, पत्नी, मुलगा आणि भावाची हत्या केली. कुटुंबातील ८ जणांची हत्या केल्यानतंर स्वत: गळफास घेतला. मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, संपूर्ण गाव सील केले आहे.आरोपीने भावाच्या एका मुलावरही कुऱ्हाडीने वार केले पण तो कसाबसा तिथून निसटला आणि याची माहिती पोलिसांना दिली. हत्येनंतर घरातील परिस्थिती भयंकर अशी होती. सर्व मृतदेह घरात वेगेवगळ्या ठिकाणी होते. घरात आणि घराबाहेर अंगणात झोपलेल्या आपल्याच नातेवाईकांची निर्घृण हत्या केल्याने छिंदवाडामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला मानसिक आजार होता. मध्यरात्री तीन वाजता झोपेतच त्याने आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्यांची हत्या केली. सर्वांचे मृतदेह अंथरुणात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीसोबत वाद झाल्याने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे.

अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून अधिकारी पत्नीची केली हत्या…

पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…

धक्कादायक! छोटा भाऊ, वहिनी अन् चिमुकल्याची सपासप वार करत केली हत्या….

अमरावती हादरली! जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!