Video News: पोलिसकाका वरील Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

हिट ऍण्ड रन! आरोपी मिहीर शाह याला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई : वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचं लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे. सिमरन नावाच्या युवतीने आठ महिन्यात नऊ मुलांसोबत लग्न केली होती. पण, एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे अलगद जाळ्यात अडकली.

पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण
पुणे : पोलिसांनी भरधाव वेगाने येणारी कार थांबवण्यास सांगितल्याने थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोडवर घडली आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके व बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिकमध्ये हिट ऍण्ड रनमध्ये चिमुकलीचा जागीच मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये हिट ऍण्ड रनची तिसरी घटना घडली आहे. सिटीलिंक बसच्या धडकेमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. सानू सागर गवई असे मृत मुलीचे नाव आहे.

नाशिकमध्ये युवकाला अर्धनग्न करून बेदम मारहाण
नाशिकः येवला शहरात एका युवकाला अर्धनग्न करून बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तो शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची नेहमी छेड काढून तिला त्रास देत होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ
मुंबईः अपंग असल्याचा बनावट दाखला देऊन कलेक्टर झालेल्या पूजा खेडकर यांच्याबद्दलचा सविस्तर अहवाल द्या असे निर्देश मसुरी सेंटरने दिले आहेत. वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांनी खोटे ओबीसी सर्टिफिकेट सादर करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समोर आले असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील दोन अभियंत्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींमध्ये शाखा अभियंता आर इंगळे आणि उपअभियंता डी. बी. कपिले यांचा समावेश आहे.

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीची दगडाने ठेचून हत्या
जालनाः खूनाच्या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. १० ते ११ युवकांनी दिवसाढवळ्या दगडाने ठेचून आरोपीस ठार केले असून या घटनेची दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत.

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबियांनी जिवंत जाळले
नाशिक: निफाड तालुक्यात जमिनीच्या वादातून एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. कचेश्वर नागरे (वय 80) यांच्या अंगावर सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनीच डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले.

तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठेला नाशिकमधून केली अटक
नाशिकः तेलंगणाच्या पोलिसांनी गांजाच्या तस्करी प्रकरणात नाशिकच्या पंचवटी भागात कारवाई केली. गांजा तस्कर प्रकरणी लक्ष्मी ताठे आणि तिच्या मुलाला अटक केली आहे. ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!