अमृता फडणवीस यांच्या बाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी एकास अटक…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह रिट्विट केल्याच्या प्रकरणात घाटंजी येथील सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा (वय ४७) याला पुणे पोलिसांच्या सायबर सेल शाखेने घाटंजी येथे येऊन ताब्यात घेतले आहे.

पुणे सायबर पोलिस स्टेशनमध्ये शैलेश नंदकिशोर वर्मा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(१)(४), ३(५), ३५६ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी त्यांचे ट्विटर (आताचे एक्स) अकाउंट @shailesh_varmaa यावरून आक्षेपार्ह आशय असलेले एक ट्विट शैलेश वर्मा यांनी रिट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले असले तरी, त्या रिट्विटच्या आधारे पुणे पोलिसांनी घाटंजी येथील सुवर्णकार शैलेश वर्मा विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

संशयित आरोपी शैलेश वर्मा याने आपली अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, १७ मे २०२५ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी घाटंजी येथे येऊन शैलेश वर्मा यास ताब्यात घेतले. १५ जुलै २०१५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास पुणे सायबर शाखेचे पोलिस उप निरीक्षक अविनाश लोहोटे आणि त्यांचे पथक घाटंजी येथे आले होते. संशयित आरोपी शैलेश वर्मा यास घाटंजी पोलिस स्टेशन मध्ये बोलावून नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पुणे पोलिसांना माहिती विचारली असता, पुणे पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, संशयित आरोपी शैलेश वर्मा यांस पुणे येथे नेत असल्याबाबतचे सुचना पत्र पुणे पोलिसांनी घाटंजी येथील एका फर्निचर विक्रेत्यास दिले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

फेसबुकवरील महिलेच्या मैत्रीमुळे गेला अधिकाऱ्याचा जीव…

IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…

लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…

Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Cyber Crime! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणारे ताब्यात…

पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!