
नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…
नाशिक: नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या कंपनीच्या एचआर निदा खान अद्याप फरार असून, तिचा शोध सुरू आहे. आयटी कंपनीत अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर TCS कंपनीने आपलं कामकाज थांबवले आहे.
नाशिकच्या टीसीएस कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झाडाझडती घेण्यात आली आहे. या कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून Work From Home करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली टीमकडून झाडाझडती घेतली असून कंपनीत सुरू असलेल्या काळ्या कारनाम्यांची चौकशी करण्यात आली आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाची कंपनीने अंतर्गत विभागीय तपासणी सुरू केली आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या जबाबात काही गंभीर तक्रारी समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकारानंतर कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देखील कंपनीत धाड टाकण्यात आली. मात्र तपासासाठी गेलेल्या टीमला कंपनीत एकही कर्मचारी आढळला नाही. या पथकाने शॉप अॅक्ट आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला नाशिकमध्ये या कंपनीत जाऊन पाहणी करणार आहे. त्यानंतर यात काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील TCS कंपनीचं हे युनीट चौकशीच्या भोवऱ्यात सापडल्याने TCS ने आपल्या नाशिक येथील युनिटमधील कामकाज स्थगित केले आहे. TCS ने कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित न राहण्याचे निर्देश दिले आहेत. एवढंच नव्हे तर नाशिक युनिटमधील नवीन भरती प्रक्रिया देखील थांबवली आहे. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत येथील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…
अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

