
पुणे ! कोंढव्यात ATS आणि पुणे पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन; संशयित ताब्यात…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात ATS आणि पुणे पोलिसांनी मध्यरात्रीपासून तब्बल 18 ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन राबवत आहेत. या कारवाईने केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आले होते. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आले आहेत.
कोंढवा परिसरातील हे संयुक्त सर्च ऑपरेशन असून त्यात महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Maharashtra | Multiple enforcement agencies, including Pune Police, are conducting searches in Pune’s Kondhwa area to trace suspects allegedly involved in anti-national activities: Pune City Police
— ANI (@ANI) October 9, 2025
पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर घातली बंदी; आदेश मोडल्यास…
पुणे! न्यायालयातून पलायन करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात…
पुणे शहरात अंमली पदार्थ टास्क फोर्सची स्थापना; पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार…
गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

