नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…

नाशिक : नाशिक धर्मांतर प्रकरणातील संशयीत आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जात तिने गरोदर असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. गरोदर असल्याकारणामुळे तिच्या या जामिन अर्जावर १८ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

निदा खान ही फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. या सगळ्या परिस्थितीचा SIT कडून तपास सुरू आहे. दुसरीकडे निदा खान गर्भवती असल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. पहिल्याच बाळाच्या प्रतिक्षेत असताना जर अटक झाली तर पोटातील बाळावर हा मोठा अन्याय होईल असं तिचं म्हणणे आहे. तसेच अटक न करता, तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचाही दावा निदा खान हिने केला आहे. तुरुंगातील आरोपी शफीला झालेल्या मारहाणीमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही निदा खान हिने उपस्थित केला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

संबंधित प्रकरणाचा तपास केवळ साक्षीपुरता मर्यादित न राहता तांत्रिक पुराव्यांवर केंद्रित करण्यात आला आहे. संशयितांचे मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, तसेच इतर डिजिटल माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता संबंधित कंपनीने नाशिकमधील कार्यालय तात्पुरते बंद ठेवले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले असून, याबाबत ईमेलद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

सुनावणीदरम्यान काही संशयितांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप न्यायालयासमोर मांडला होता. या गंभीर आरोपाची दखल घेत न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तुरुंग प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…

नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…

अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…

नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!