लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…

लोणावळा (संदीप कद्रे): संकल्प नशामुक्ती अंतर्गत ८ नशेखोरांवर कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने दंड ठोठावला आहे. यामुळे नशेखोरांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण व सहा. पोलिस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातून लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत ‘गांजा’ या मादक पदार्थाचे सेवन करीत असताना मिळून आलेल्या ८ नशेखोरांवर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि. १९८५ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारत लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करण्यात आली.

लोणावळा पोलिसांनी तपास करुन दोषारोप पत्रासह आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी १०००/- रुदंड व दंड न भरल्यास ७ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावल्याने नशेखोरांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे कोणी नशेखोर दिसून आल्यास तात्काळ लोणावळा शहर पोलिस स्टेशनला कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरीकांनी प्रत्येक प्रकारच्या नशे पासून अलिप्त राहुन आपली व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहान करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अंकित गोयल सो पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये व अपर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, सहा. पोलिस अधिक्षक, सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक सिताराम डुबल लोणावळा शहर पोलिस स्टेशन यांचे सुचना नुसार पोहवा / ८८२ जयराज पाटणकर, पोना / ११९३ हनुमंत शिंदे, पोशि/३७३ गायकवाड, पोशि / १२२३ पाटिल यांनी केली असुन कोर्ट पैरवी म्हणुन पोना / १०२७ सुधीर डुंबरे यांनी कामकाज पाहिले आहे.

लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

बारामतीमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त पण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!