पोलिसकाका Video News: 01 ऑगस्ट रोजीच्या Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

युपीएससीची मोठी कारवाई! पूजा खेडकर दोषी, उमेदवारी रद्द
नवी दिल्ली : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला युपीएससीने दोषी ठरवले असून तिची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. युपीएससीने तिला दोषी ठरवले नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला होता. त्यानंतर युपीएससीने दुपारपर्यंत तिला म्हणणे मांडण्यास वेळ दिला होता. पण तिने काहीच प्रतिसाद न दिल्याने आणि तिचे रेकॉर्ड तपासल्यानंतर पूजा खेडकरवर कारवाई केली. २००९ ते २०२३ या कालावधीतील १५ हजार उमेदवारांचे रेकॉर्ड तपासण्यात आले असून पूजा खेडकर वगळता कोणीही दोषी आढळलेले नाही.

गँगस्टर अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का
नवी दिल्लीः कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात गँगस्टर अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेवर बंदी घालण्याबाबतच्या पूर्वीच्या आदेशाची पुष्टी केली. पुढील सुनावणीसाठी 20 नोव्हेंबरची तारीख ठेवली आहे.

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपासाला वेगळी दिशा
मुंबई : उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात तपासाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मृतहेदाचे शवविच्छेदन करताना यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू (गोंदलेलं) आढळले आहेत. यामध्ये टॅटूमध्ये आरोपी दाऊद शेख याचे नावही मिळाले आहे. यावरुन तपास करत असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. दाऊद शेखने यशश्रीला टॅटू काढण्यास भाग पाडले की तिच्या संमतीने हे केले गेले, याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

भाजप आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या
बुलडाणा : भाजप आमदार श्वेता महाले यांचा बॉडीगार्ड अजय गिरी यांनी रिव्हॉल्वरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अजय गिरी पोलिस वसाहतीमध्ये राहत होते, त्यांनी घरगुती कारणावरून जीवन संपवल्याची माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला
मुंबईः भाईंदर पश्चिम परिसरात वालचंद नगर परिसरात गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अटकेला विरोध करत आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गरम पाणी फेकले. पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लातूरमध्ये हॉस्टेलच्या बाथरूममध्येच जीवन संपवलं
लातूरः लातूर शहरातील एका नामांकित वस्तीगृहात तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चार दिवसपूर्वी हा विद्यार्थी हॉस्टेलमधून पळून गेला होता पण त्याला परत आणले होते. संबंधित विद्यार्थ्यांने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जालन्यात तलवारींचा मोठा शस्त्रसाठा जप्त
जालना : जालन्यामध्ये तलवारींचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 22 तलवारी जप्त केल्या आहेत. अमृतसरहून तलवारींचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. एका पार्सलमध्ये त्यांना 22 तलवारी आढळून आल्या आहेत. या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मैत्रिणीला मुलगा बनून पाठवली ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ आणि आत्महत्या
सातारा: मुलाच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला ‘फ्रेंड’ केले. ही मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या सर्व प्रकारास कारणीभूत ठरलेल्या संशयित युवतीला आता पोलिसांनी अटक केली आहे.

हनी ट्रॅप! महिलेने व्हिडिओ कॉल करून केली मैत्री आणि फसवले
मंडी : हिमाचल प्रदेशमध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने गोड बोलून एका पुरुषाला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याची 27 लाखांची फसवणूक केली. महिलेने व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करून संबंधित व्यक्तीशी मैत्री केली होती. संबंधित व्यक्तीने सायबर क्राईम पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली आणि न्याय मिळवून देण्याची विनंती केली.

पाकिस्तानमधील इंटरनॅशनल भिकारी; सापडलं मोठं घबाड
लाहोरः पाकिस्तानामध्ये एक भिकारी बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आणि चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांना भिकाऱ्याच्या खिशातून पाच लाख रुपये व पासपोर्ट सापडला. हा भिकारी अनेकदा सौदी अरेबियाला गेल्याचा उल्लेख पासपोर्टमध्ये होता. भिकाऱ्याकडे एवढी मोठी रक्कम आणि पासपोर्ट सापडल्यामुळे तो भिकारी नसावा किंवा तो एखादी मोठी टोळी चालवत असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!