पोलिस बेपत्ता मुलीचा शोध घेऊन पुण्याहून आले अन् घेतला गळफास…

बीड: माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळकृष्ण जायभाये (वय ३५) असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

माजलगाव शहरातील एक मुलगी बेपत्ता झाली होती, तिच्या शोधासाठी जायभाये हे पुणे येथे गेले होते. तपास पूर्ण करून आणि संबंधित काम व्यवस्थित हाताळून ते रात्री उशिरा पुण्यावरून आपल्या घरी परतले होते. घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांनी हे पाऊल उचलले आहे. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. या घटनेनंतर पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

प्राथमिक माहितीनुसार कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ अधिकच वाढले आहे. पोलिस आता त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विचारपूस करत आहेत. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, बीडमधील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे समोर आले होते. काही दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलिस तिचा तपास करत होते. मृत मुलीचा वर्षभरापूर्वी विवाह झाला. लग्नानंतरचे पहिले सहा महिने ती सासरी होती, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिस कर्मचाऱ्याने घरात घेतला गळफास; पोलिस दलात खळबळ…

पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…

बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…

पुणे वाहतूक शाखेतील पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या…

मुंबईत पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या…

लग्न ठरलं होतं! पुणे पोलिसाची आत्महत्या अन् कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!