
महाराष्ट्रातील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने जाऊन टोळी टाकायची दरोडे…
ठाणे : कल्याण-आंबिवली परिसरामध्ये राहणाऱ्या इराणी वस्तीमधील एका चोराचा चेन्नईमध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. विमानाने परराज्यात जाऊन दरोडे टाकण्याचे काम एका टोळीकडून केली जात होती. चेन्नई पोलिसांनी या टोळीतील एकाचा एन्काऊंटर केला असून दोघेजण गंभीर जखमी आहेत. विविध गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले हे गुन्हेगार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. जाफर गुलाम इराणी या चोराचा पोलिसाच्या चकमकीत एन्काऊंटर झाला आहे.
कल्याण-आंबिवली परिसरामध्ये इराणी वस्ती मोठ्या प्रमाणामध्ये असून, अनेकजण चोऱ्या करत आहेत. हे चोर परराज्यात विमानाने प्रवास करत चोऱ्या करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. सलमान मेश्राम, अमजद इराणी, जाफर गुलाम हुसेन इराणी हे तिघे महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये विमानाने जाऊन चोऱ्या करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, चेन्नईमध्ये हे आरोपी मंगळवारी चोरी करण्याच्या उद्देशाने गेले असताना पोलिसांच्या झडापटीत एकाचा एन्काऊंट करण्यात आला. चेन्नईमधून तब्बल दहा किलो सोन्याची चोरी करुन जात असताना चेन्नई पोलिसांच्या झटापटीमध्ये जाफर गुलाम इराणी या चोराचा चेन्नई पोलिसांनी एन्काऊंटर करण्यात आला. तर, या झटापटीत सलमान मेश्राम आणि अमजद इराणी हे दोघे जखमी झाले आहेत.
चेन्नई पोलिसांकूडन कल्याण पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली असून, आरोपींच्या नातेवाईकांना देखील कळवण्यात आले आहे. त्यानंतर, ठार झालेल्या आरोपीचे नातेवाईक कल्याण आंबिवलीवरुन चेन्नईला मृतदेह आणण्यासाठी रवाना झाले आहेत.
पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…
सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…
भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू…
सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

