हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…

जळगाव : अयोध्या नगर येथील नीलेश सुरेश सोनवणे (वय २५) या युवकाने नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक उल्लेखही त्याने त्यात केला आहे.

नीलेश सोनवणे याचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले होते. त्याने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता. परंतु, नोकरी मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता. नीलेश हा मंगळवारी घरी एकटाच होता. त्या वेळी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

आपण स्वत:च्या इच्छेने जीवन संपवत असून आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही. खूप प्रयत्न करुनही चांगला जॉब लागत नसल्याने मी टेन्शनमध्ये होतो. खूप डिप्रेशनमध्ये आलो होतो. कुणीही माझ्या परिवाराला आणि इतर कोणालाही त्रास देऊ नये. मी माझ्या इच्छेने जीवन संपवत आहे. पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय, असे सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. दरम्यान, नीलेशच्या जाण्याने कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आत्महत्या केलेल्या बापलेकाच्या घराची पोलिसांकडून झडती; एका चिठ्ठीने वाढवलं गूढ…

महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!