देहुरोड पोलिसांनी ६० सीसीटीव्ही तपासून ११ दुचाकी चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या…
पुणे (महेश बुलाख): पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय परिसरातील ११ मोटार सायकली चोरी करून त्या मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवून त्यांचेकडुन पैसे खात्यावर घेवून त्यांची फसवणुक करणाऱ्या चोरट्यांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंध घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिल्याने देहुरोड पोलिस तपास पथकाने देहुरोड पोलिस स्टेशन गु.रजि. नं. ४७८/२०२३ भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्ह्याचे घटनास्थळाचे परिसरातील ५०-६० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक केले. दोन जण मोटार सायकल चोरी करून घेवून गेल्याचे सीसीटीव्हीमधून निष्पन्न झाले. संबंधीत आरोपी बीड येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने देहुरोड तपासपथकाने आरोपी
१) अम्रत भाऊसाहेब देशमुख, वय ४६ वर्षे, रा. मु. कान्नापूर, पो. सिरसाळा, ता.धारूर, जि. बीड
२) फारूक शब्बीर शेख, वय ३७ वर्षे, रा. मोहा रोड, सिरसाळा, ता. परळी बीड यांनासिरसाळा, जि बीड येथुन सापळा लावुन ताब्यात घेतले. त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांचीपोलिस कोठडी रिमांड मिळून त्यांचेकडे केलेल्या तपासात तसेच तांत्रीक तपासादरम्यान देहुरोड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, औरंगाबाद, घोडेगाव अहमदनगर येथून चोरी केलेल्या ८,००,०००/- रुपये किंमतीच्या ११ मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
चोरी केलेल्या मोटार सायकलीपैकी ०६ मोटारसायकली आळंदी मरकळ रोड, लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरळी परिसरातील वेगवेगळ्या मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवून त्यांचेकडुन पैसे ट्रान्सफर करून घेवून पैसे परत घेवून येतो असे सांगून त्यांची फसवणुक केली आहे. अटक आरोपींकडून देहुरोड पोलिस स्टेशनचे ०३ गुन्हे, आळंदी पोलिस स्टेशनचे ०३ गुन्हे, सांगवी, हिंजवडी, क्रांतीचौक पो.स्टे. औरंगाबाद शहर, सोनई पो.स्टे. जि. अहमदनगर पोलिस स्टेशनचे प्रत्येकी एक असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणण्यात देहुरोड पोलिसांना यश आले आहे. उर्ववरीत ०१ मोटार सायकलबाबत देहुरोड पोलिस अधिक तपास करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह. आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ – २ डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलिस आयुक्त, देहुरोड विभाग पद्याकर घनवट, पोलिस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे पोलिस अंमलदार बाळासाहेब विधाते, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, निलेश जाधव युवराज माने, सचिन शेजाळ, स्वप्नील साबळे, संतोष महाडीक यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने भरदिवसा खून; दोघांना अटक…
पिंपरी-चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…
पोलिस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी पाच गुन्हेगारांना केले हद्दपार; पाहा नावे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…