Video: जिगरबाज युवती चोरावर अक्षरशः तुटूनच पडली…
लंडन: एक जिगरबाज युवती चोरावर अक्षरशः तुटून पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ कोट्यावधी नेटिझन्सनी पाहिला असून, युवतीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.
@cctvidiots नावाच्या ट्विटर अकाउंटवर अनेकदा धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चोर दुकानात घुसतो आणि लुटमार सुरू करतो. दुकानातील युवती धाडसाने त्याला सामोरी जाते. चोराने अनेकदा हल्ला करूनही ती खंबीर राहिली आणि तिच्या दुकानात चोरी होण्यापासून रोखले. व्हिडिओ खरा असो वा नसो, पण युवतीने दाखवलेलं धाडस पाहून इतर मुलींनीही तिच्यापासून प्रेरणा घ्यावी. व्हायरल झालेला व्हिडिओ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.
युवती दुकानात अचानक एक व्यक्ती आत शिरतो. तो बंदूक काढतो आणि पैशाची मागणी करू लागतो. युवती चाकू काढते आणि त्या व्यक्तीकडे दाखवते. हा व्यक्ती तिच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने तिच्याकडे येतो. युवती चोरावर चाकूने हल्ला करते. मग तो चोर तिला लाथाबुक्क्यांनी मारतो आणि हातात जे येईल ते तिला मारायला लागतो, पण ती महिला शेवटपर्यंत लढत राहते आणि ती चोरावर अनेकदा हल्लाही करते. शेवटी ती त्याला दुकानातून बाहेर काढतेच.
दरम्यान, व्हायरल व्हिडिओ 1 कोटीहून अधिक जणांनी पाहिला असून, अनेकांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. एकाने म्हटलं की, प्रत्येकाने असंच केले पाहिजे, तरच चोरांना धडा मिळेल. व्यक्तीने चोरीतून निवृत्ती घ्यावी, असेही एकाने म्हटले आहे.
An employee defends herself with a knife from a robbery in bakery. pic.twitter.com/ar0LeBHeQn
— CCTV IDIOTS (@cctvidiots) August 25, 2023
Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…
Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…
Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…
धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…
Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…