
शाळेत सुटला संयम! शिक्षिकेला मारली पाठीमागून मिठी अन् म्हणाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): शाळेतच महिला शिक्षिकेला पाठीमागून मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये घडली आहे. पीडित महिला शिक्षिकेने गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिक्षिकेचे म्हणणे आहे की, डीनने पाठीमागून पकडल्यानंतर मी विरोध केला तेव्हा त्याने फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, मी तुला दररोज एकटीला भेटायला फोन करतो, पण तू येत नाहीस, आता रात्री शांतपणे फ्लॅटमध्ये एकटी भेटायला ये. जर तुला मोबाईल हवा असेल तर तुला यावे लागेल. शिक्षिकेने सांगितले की मी तक्रार घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले तेव्हा त्यांनी मला हकालपट्टीचे पत्र दिले. शाळेच्या डीनवर विनयभंगाचा आरोप केला आहे. सिग्रा पोलिस स्टेशन परिसरातील डालमियास सनबीम स्कूल आहे. पीडित महिला शिक्षिकेने बुधवारी सिग्रा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. पोलिसांनी सांगितले की महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डीन सुबोधदीप डेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डीन अजूनही फरार आहे.
पीडित शिक्षिकेने तक्रारीत म्हटले आहे की, ‘मी 2019 पासून डाल्मियास सनबीम शाळेत शिक्षिका आहे. 27 मे रोजी सकाळी 11 वाजता मी माझ्या पतीला काही महत्त्वाच्या कामासाठी फोन करण्यासाठी शाळेतील एका खोलीत गेले होते. अचानक डीन खोलीत आला आणि मला पाठीमागून मिठी मारली. मी विरोध केला असता त्याने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, ‘रोज मी तुला एकटीला भेटायला फोन करतो पण तू येत नाहीस, आता रात्री शांतपणे फ्लॅटमध्ये एकटीच मला भेटायला ये. जर तुला मोबाईल हवा असेल तर तुला यावे लागेल.’ असे म्हणत डीन निघून गेला. यानंतर मी शाळेतील एका कर्मचाऱ्याचा मोबाईल घेतला आणि माझ्या पतीला सर्व माहिती दिली. माझ्या पतीने मला शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगण्यास सांगितले. मी मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्याचे धाडस करत असताना अचानक मुख्याध्यापकांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. त्यांनी मला शाळेतून हकालपट्टीचे पत्र दिले. मी मुख्याध्यापकांना डीनच्या कृतीबद्दल सांगितले. पण, ते त्यांची बाजू घेत होते. डीन त्याआधीच मुख्याध्यापकांना भेटल्याचे उघड झाले. त्यांच्या सूचनेनुसार मला शाळेतून काढून टाकण्यात येत होते.’
शाळेच्या आवारात डीनने केलेले अश्लील कृत्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे. शाळा व्यवस्थापन त्यावेळचे फुटेज डिलीट करू शकते अशी भीती आहे. शिक्षिकेचा आरोप आहे की, डीन शाळेत काम करणाऱ्या इतर महिला शिक्षिकांवरही लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणतो. दरम्यान, शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीन अजूनही फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी छापे टाकले आहेत.
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…
मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…
Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…
धक्कादायक! पुणे शहरात शिक्षिकेने शाळेतच ठेवले विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध…
मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…

