वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट ६ने केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): गुन्हे शाखा युनिट ६ने धडाकेबाज कारवाई करत वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक केली आहे. शिवाय, एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, 24 तासात गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी या गुन्ह्यांना आळा बसावा या करिता मोहीम राबवून कारवाई करणेबाबत पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आदेशित केले होते. दिनांक 09/09/2023 रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मपोशि 10857 ज्योती काळे व पो अं 8203 सचिन पवार यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पोलिस स्टेशन 736/2023 भा दं वि क 454,457,380 हा गुन्हा ओंकार गोसावी याने केलेला असून तो हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथे थांबलेला आहे. माहितीची खातरजमा करुन वपोनि रजनीश निर्मल यांना कळविले असता त्यांनी सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी करणेबाबत आदेशित केले.

पोउप निरीक्षक सुरेश जायभाय यांनी वेगवेगळ्या टीम बनवून ताब्यात घेतले. ओंकार सुरेश गोसावी (वय 21 वर्षे रा. सहारा प्रेस्टिजजवळ, जगदाळे निवास, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) असे त्याने नाव सांगितले. त्याचेकडे वर नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागला. त्यास त्याचे ताब्यातील दुचाकीसह ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन अधिक तपास करता सदरचा गुन्हा त्याने त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक याचे मदतीने केल्याची कबुली दिली आहे. तांत्रिक विश्लेषन द्वारे शोध घेत असताना तो फुरसुंगी परिसरात असलेबाबत माहिती मिळाल्याने आरोपी ओंकार गोसावी सह जावून शोध घेतला असता तो फाटे कॉलनी येथे रस्त्याने पायी चालत असलेला मिळून आला. त्याच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिनेची तसेच रोख रक्कम तसेच वेगवेगळ्या कंपनीचे 05 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,47,400/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे.

सदरची कामगिरी रामनाथ पोकळे (अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलिस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलिस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पो उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पो हवा मच्छिंद्र वाळके, पो ना विठ्ठल खेडकर, संभाजी सकटे, रमेश मेमाने, नितीन मुंढे, प्रतीक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, अशफाक मुलाणी, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर पथकाने केलेली आहे.

मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश…

पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…

पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…

पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…

पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!