पिंपरी-चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात धारदार कोयत्याचा धाक दाखवून सोनसाखळी, मोबाईल चोरी, वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महीलांच्या गळयातील सोन्याचे दागीने हिसडा मारुन चोरणारे, नागरिकांचे महागडे मोबाईल जबरीचोरी करणारे व वाहनचोरीचे गुन्हे करणा-या गुन्हेगारांना जेरबंद करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते. गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट २ पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार सातत्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार, नविन उभरते बाल गुन्हेगार यांचेवर पाळत ठेवून तसेच घडलेल्या गुन्हयांचा बारकाईने अभ्यास करुन गुन्हेगारांचा शोध घेत होते.

निगडी, चिखली, भोसरी परिसरामध्ये घडलेले सोनसाखळी चोरीचे गुन्हे, चिखली परिसरातील तोडफोड व धारदार कोयत्यांचा धाक दाखवुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करुन गुन्हेगारांच्या टोळक्याने केलेले मोबाईल चोरीचे व वाहनचोरीचे गुन्हयांमध्ये गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी युनिट २ पथकाने पाहणी करुन तसेच गोपनिय बातमीदारांकरवी माहीती घेवून गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. निष्पन्न झालेल्या गुन्हेगारांचे मोबाईलचे तांत्रीक विश्लेषण करुन व गुन्हेगारांचा सातत्याने शोध
१) महमंद मुस्ताक सिध्दीकी वय २४ वर्षे, रा. यहिया कॉलनी, सिध्देश्वर मंदिराच्या पाठीमागे, पटेलनगर, लातुर
२) पांडुरंग बालाजी कांबळे, वय २३ वर्षे, रा. मु.पो. गौर ता. निलंगा जि. लातुर
३) तुषार ऊर्फ बाळया अशोक माने, वय २४ वर्षे, रा. वराळे रोड समता कॉलनी, तळेगाव दाभाडे
४) अर्जुन संभाजी कदम वय २५ वर्षे सध्या रा. नेवाळे वस्ती, केशवनगर, चिखली, पुणे. मुळ रा. गौर ता. निलंगा जि. लातुर व ४ अल्पवयीन साथीदार यांना शिताफीने ताब्यात घेतले. तसेच चोरीचे दागीने विकणारा व विकत घेणारा पक्षाल मनोज सोलंकी वय २३ वर्षे रा. प्रेमलाके पार्क, चिंचवड, पुणे व मुराद दस्तगिर मुलाणी वय ३६ वर्षे, रा. वैभवनगर समोर, पिंपरीगाव, मुळगाव- कलेढोण ता. खटाव जि. सातारा यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे अत्यंत कौशल्याने तपास करुन आरोपींनी गुन्हा करणेसाठी वापरलेले ४ धारदार जम्बो कोयते, १ तलवार, चोरीच्या ५ मोटर सायकल, ७ महागडे मोबाईल असा एकूण २,४२,४०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल व २,५०,००० /- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने असा एकूण सुमारे ५,००,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत तसेच लातुर जिल्हयामध्ये केलेले १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सोनसाखळी चोरीचे १३, वाहनचोरीचे ७, मोबाईल चोरी १ व तोडफोडीचा १ असे एकूण २२ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींकडे सखोल तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक श्री गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अंमलदार दिपक खरात, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिष कुडके, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, संदेश देशमुख, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना घेतले ताब्यात…

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!