अभिनेते धर्मेंद्र उपचारासाठी अमेरिकेला रवाना…

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ८७) यांची तब्येत बिघडली असून ते उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहेत. त्यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलही त्यांच्यासोबत आहे. धर्मेंद्र यांच्या उपचारांसाठी सनी त्यांना अमेरिकेला घेऊन गेला आहे. पुढील 20 दिवस तो त्यांच्यासोबत राहणार आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण आता काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील 15-20 दिवस अमेरिकेत धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असणार आहेत. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

धर्मेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी मनोरंजनसृष्टीत कमबॅक केले आहे. त्यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र रणवीर सिंह याच्या आजोबांच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला आणि धर्मेंद्र यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमेरिकेत उपचार करुन भारतात आल्यानंतर ते पुन्हा एकदा आगामी चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

दुसरीकडे, सनी देओलचा ‘गदर 2’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस धमाका करत आहे. ‘गदर 2’ या सिनेमाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2001 मध्ये आलेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटातील तारा सिंह आणि सकीनाची जोडी, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. सनी देओलसह या सिनेमात अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!