पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. चिखली गावामध्ये टाळगाव चिखली कमानीजवळ कृष्णा उर्फ सोन्या तापकीर (वय २०) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये सोन्याचा जागीच मृत्यू झाला.

हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी सोन्या तापकीरला रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोन्यावर नेमका कुणी हल्ला केला याचा तपास पोलिस घेत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसातच गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत.

दरम्यान, तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली होती. वडिलांचा अपमान केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाच्या मुलानेच ही हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने मित्रांच्या मदतीने हा खून केला, असा दावा पोलिसांनी केला.

किशोर आवारे यांची दुपारी दोन वाजता तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात हत्या झाली. यावेळी हल्लेखोरांनी आधी गोळी झाडल्या. या गोळीबारात किशोर आवारे जागीच कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी आवारे यांच्या डोक्यात कोयत्यानेही वार केले. यामुळे किशोर आवारे यांच्या चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. शिवाय, 1 एप्रिलला मावळमध्येही शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सरपंच प्रविण गोपाळे यांचा मृत्यू झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!