नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…

नाशिक : नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच असून गेल्या तीन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहे. सातपूर अंबड लिंक रोड भागात एका वीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

अंबड भागात एकाच दिवशी दोन युवकांचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. शहरातील होलाराम कॉलनी परिसरात खुनाची पहिली घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. विवाहित महिलेचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने पाणी न दिल्याने झालेल्या वादातून ही घटना घडली. श्याम अशोक पवार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत 29 वर्षीय विवाहित असलेल्या आरतीचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्याम पवार हा बिगारी काम करत होता तर मृत महिला धुणे भांडी करत होती. मंगळवारी श्याम पवार काम करुन रात्री आठ साडे आठ वाजेच्या सुमारास घरी आला. यावेळेस मुलाकडे त्याने पाणी मागितले. तो खेळत असल्यामुळे त्याने पाणी दिले नाही. त्यामुळे संतापात श्यामने या मुलाच्या मारले. यानंतर श्याम आणि आरतीमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर आरतीने शिवीगाळ करत श्यामला लाथ मारली. त्यानंतर संतप्त झालेल्या श्यामने जवळच पडलेला धारदार सुरा उचलून आरतीच्या पाठीत खुपसला. त्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर, निरीक्षक तुषार आढावू तसेच सहाय्यक निरीक्षक खैरणार, भोये आदींनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत संशयितास अटक केली.

दुसऱ्या घटनेत सिडको परिसरातील मयूर केशव दातीर या युवकाची हत्या झाल्याची घटना घडली. अंबडच्या स्वामी नगरातील समाज मंदिर परिसरामध्ये हा खून झाला. आठ दिवसापूर्वीच संजीव नगर भागात दोन युवकांचे खून झाले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन प्राणघातक हल्ल्यात झाले. करण कडुसकर, रवी आहेर, मुकेश मगर यांनी धारदार शस्त्राने मयूर दातीर याच्या छाती व पोटावर वार केले. हे घाव वर्मी बसल्याने मयूरचा जागीच मृत्यू झाला. यातील करण कडुसकर याच्यावर खून, घरफोडी सह 18 गुन्हे दाखल आहेत. तर मुकेश मगर याला हद्दपार करून अहमदनगर जिल्ह्यात सोडण्यात आले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…

पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…

प्रियकरासह त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीचे न्यूड फोटो केले व्हायरल…

बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!