पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

नागपूर : लग्नासाठी एका गावात गेल्यानंतर नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील सुखदेव सार्वे (वय 56) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

पोलिस कॉन्स्टेबलच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून यातूनच आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. यानंतर आरोपींविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृत कॉन्स्टेबल हे मुळचे भंडारा जिल्ह्यातील गुंथारा येथील होते.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

सुनील सुखदेव सार्वे हे 26 मे रोजी पत्नी आणि बहिणीसह एका लग्नासाठी गुंथारा येथे गेले होते. तिथेच त्यांना काही लोकांनी मारहाण केली. यानंतर ते नागपुरला परत येऊन ड्यूटीवरही गेले होते. मात्र, तिथेच त्यांनी विष प्राशन केले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

खिशातील चिठ्ठीमध्ये त्यांनी गावामध्ये आपल्याला मारहाण केलेल्या लोकांची नावेही लिहिली होती. यात भोजराज सार्वे, शेषराव सार्वे, निलेश सार्वे, धनराज सार्वे आणि भूष सार्वे यांनी एका नातेवाईक महिलेसमोरच मारहाण केली. याच नैराश्यात आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं…

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…

धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…

पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!