नाशिकमध्ये चोरांनी दिले थेट पोलिसांनाच आव्हान…
नाशिक : नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चंदन चोरांकडून करण्यात आला आहे. शरणपूर रोडवरील पोलीस लाईन व पोलीस उपायुक्तांच्या घरासमोरील एसपींचे निवासस्थान लक्ष करुन चंदनचोरांनी थेट नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हान दिले आहे.
नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात सहा दरोडेखोर घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानातील चंदन चोरी करण्यासाठी आलेल्या संशयितांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांत दरोड्याच्या प्रयत्नाची फिर्याद देण्यात आली. सरकारवाडा पोलिसांत सहा अज्ञातांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
5 ऑगस्ट रोजी पहाटे 2.45 ते 3.30 या कालावधीत सहा अज्ञातांनी हातात लोखंडी रॉड, दांडके, दगडे व कटर मशिनसह पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील पोलीस वेळीच सावध झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिक गुन्हे शोध पथकाने संशयितांचा माग सुरू केला आहे. त्यानंतर संशयितांपैकी दोघांना ताब्यात घेत ओझरच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर एसपींच्या बंगल्यातील दरोड्याच्या प्रयत्नातील कबूली संशयितांनी दिली. पोलिसांच्या घरापर्यंत पोहोचून चोरटे बिनधास्त गुन्हे करीत असल्याने पोलिसांच्याच सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, गेल्या आठवडभरात शहर आणि जिल्ह्यात चंदनचोरीचे पाचहून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्यातील केवळ ओझर येथील गुन्हा उघड झाला आहे. यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यात, तसेच सेंट्रल जेलचे कारागृह अधीक्षक, आयुक्तांचे निवासस्थान व अन्य ठिकाणांहून चंदनाची चोरी झाली आहे.
नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…
नाशिकमध्ये गुन्हेगारांची हिंमत वाढली! पोलिस पथकावरच हल्ला…
नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक अन् घोषणा…
नाशिक हादरलं! थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला अन्…
नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…