Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…

अलवर (राजस्थान): पाकिस्तानमध्ये गेलेल्या अंजू हिने धर्म परिवर्तन केले असून, फेसबुक फ्रेंन्ड नसरुल्लाह याच्यासोबत लग्न गेले आहे. पाकिस्तानमधून तिने पहिला पती अरविंद याला फोन करून शिवीगाळ केली आहे.

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू आता फातिमा बनली आहे. अंजूने पाकिस्तानातून फोन करून आपला पूर्वीचा पती अरविंद याला धमकावण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओमध्ये अंजू उर्फ फातिमा ही अरविंद याला शिवीगाळ करताना दिसून येत आहे. तू विचारही करू शकत नाही, मी कोणत्याही थराला जाऊ शकते, असेही या व्हिडीओमध्ये तिने म्हटले आहे.

मी माझ्या मुलांसाठी भारतात येईल, असेही तिने फोनवर म्हटले आहे. यावेळी अंजू आणि अरविंद या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अरविंद याला देखील राग अनावर झाला आणि त्यानेही तिला चांगलेच सुनावले आहे. आता तू आमच्यासाठी मेली आहेस. तू पाकिस्तानमध्ये जे काही करत आहेस, त्यामुळे आमची बदनामी होत असल्याचे अरविंदने म्हटले आहे. दोन मिनीटं 55 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये अनेकदा शिव्या आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओमध्ये दोघांमध्ये आपल्या मुलांवरून भांडण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मुलं माझ्या जवळच राहणार असे अरविंद याने तिला सांगितल आहे. मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा देखील नाही असेही तो म्हणाला. मात्र, मी माझ्या मुलांसाठी भारतात येईल असे अंजूने म्हटले असून, अरविंद याला शिवीगाळ देखील केली आहे.

अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…

Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…

अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…

पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात…

प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!