सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…

पुणे (संदिप कद्रे): सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कारवायांचा धडाका सुरू ठेवला असून, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई करत वेगवेगळे ३ गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना २२/१/२०२५ रोजी पहाटे लोणावळा शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत जी वार्ड लोणावळा येथे ताबान जायर पठाण (वय २८ रा जी वार्ड इराणी चाळ) हा मेफेड्रॉन पावडर (एम डी) ची ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी लागलीच पंच व पोलिस पथकासह बातमी मिळाले ठिकाणी छापा टाकला असता ताबान पठाण याच्या अंगझडतीमध्ये ३.६२ ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन पावडर सापडली असून त्याची एकूण किंमत १५०००/- रुपये आहे. त्याबाबत लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला त्याच्या विरोधात NDPS एक्ट १९८५ चे कलम ८(क), २१(४) नुसार गुन्हा दाखल आहे.

सत्यसाई कार्तिक यांना २६/१/२०२५ रोजी पहाटे गोपनीय रित्या बातमी मिळाली की युनिकॉर्न मोटार सायकल नंबर MH20GT0752 ही वर दोन जण संभाजीनगर हून मोटार सायकल वर अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी घेऊन मुंबई बाजूकडे जात असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली होती. त्यांनी लागलीच पंच व पोलिस पथकासह वरसोली टोलनाक्याजवळ नाकाबंदी लावली. मोटार सायकल पहाटे ०५:०० वा चे सुमारास मिळून आली. त्यावरील १) अक्षय गोपीनाथ जाधव (वय २५), २) प्रल्हाद आसाराम जाधव (वय ३४ वर्ष दोन्ही रा आसेगांव या गंगापूर जि संभाजीनगर) अशी दोघांची नावे असून त्यांच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये ६०,५१२/- रुपये किमतीचा १५.१२८ किलो ग्रॅम वजनाचा बिया बोंडासह हिरवट काळसर तपकिरी रंगाचा ओलसर गांजा विक्रीकरिता कोठेतरी घेऊन जात असताना मिळून आला आहे. त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुरन. २४/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे (NDPS) कलम ८(क), २०(ब)(ii), BNS ३(५) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यात १ लाख रुपये किमतीची मोटरसायकल व ६०५१२/- रुपये किमतीचा मुद्देमाल असा एकूण १,६०,५१२/- चा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन करीत आहे.

सत्यसाई कार्तिक यांना २६/१/२०२५ रोजी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार जोशवुड बंगला, ई सेक्टर, गोल्ड व्हॅली, तुंगारली, लोणावळा येथे काही इसम हे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पंचासह सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी
१) अविनाश प्रकाश लोहार वय ३२ रा हडको कॉलनी लोणावळा
२) आकाश दशरथ परदेशी वय ५२ रा गवळीवाडा लोणावळा
३) बाजीराव गंगाराम मावकर वय ३९ रा तुंगारली लोणावळा
४) शेखर रामदास बोडके वय ३० रा न्यू तुंगारली लोणावळा
५) सूरज गणपत लोहट वय २७ रा गवळीवाडा लोणावळा
६) अजय गजानन घाडी वय ५८ रा कामशेत
७) संजय प्रभाकर कदम वय ५९ रा खंडाळा लोणावळा
८) शंकर वसंत सकट वय ३५ रा भास्कर नगर अंबरनाथ ठाणे
९) विनोद मारुती धुळे वय ४४ रा बाराबंगला लोणावळा
१०) मकदूम गनी शेख वय ३३ रा देहूरोड
११) सिरिल सॅमसुंदर मोजेस वय ४८ रा देहूरोड
१२) सागर श्याम पवार वय ३५ रा गवळीवाडा वय ३५ रा गवळीवाडा लोणावळा
१३) विकास भिमाजी पैलवान वय ३२ रा गवळीवाडा लोणावळा
१४) जोशवुड बंगला मालक नाव पत्ता माहीत नाही

वरील अ न १ ते १३ हे बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत तसेच अ न १४ यांनी वरील इसमाना तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी बंगला उपलब्ध करून दिला आहे. सदर छाप्यामध्ये जुगाराचे साहित्यासह एकूण ४,०८,४५०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याबाबत लोणावळा शहर पोलिस स्टेशनला गुरन ५१/२०२५ मुंबई जुगार कायदा १८८७ कलम ४, १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करत आहेत. वरील वेगवेगळ्या ३ कारवाईमध्ये एकूण १६ आरोपी अटक केले असून एकूण ५,८३,९६२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील सपोनि संतोष जाधव, पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार, अमोल तावरे, पारधी यांनी केली आहे.

लोणावळा पोलिसांनी ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा केला जप्त…

लोणावळा येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट वाटप अन् बाईक रॅली…

लोणावळा परिसरात सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई…

Video: लोणावळा येथे अश्लिल चित्रफीत तयार करणा-या टोळीवर कारवाई; पाहा नावे…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!