
एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…
मुंबईः मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची नावे समोर आली आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, पाच जणांचा शोध अद्याप सुरु आहे. 97 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. या घटनेतील मृतांची नावे समोर आली आहेत.
बोट अपघातातील मृतांची नावे :
1. महेंद्रसिंग शेखावत (नौदल)
2. प्रवीण शर्मा
3. मंगेल (नौदल बोट कर्मचारी)
4. मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी जहाज)
5. राकेश नानजी अहिरे (प्रवासी जहाज)
6. साफियाना पठाण
7. माही पावरा (3 वर्ष)
8. अक्षता राकेश अहिरे
9. मिथु राकेश अहिरे (8 वर्ष)
10. दीपक व्ही.
(दोन महिला आणि एका पुरुषाची अद्याप ओळख पटलेली नाही.)
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
गेट वे ऑफ इंडिया बोट अपघात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत दोन लाखांची मदत मृतांच्या वारसांना जाहीर केली आहे.
थरारक माहिती समोर…
या दुर्घटनेत बचावलेल्या नागरीकांकडून आता या घटनेची थरारक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एका जर्मन पर्यटकाने पुण्यात राहणाऱ्या चिमुकल्याचे जीव वाचवले आहेत. पण त्याने या अपघातात त्याचा जर्मन मित्र गमावला आहे.त्यामुळे एकीकडे चिमुकल्याचा जीव वाचवल्याचा आनंद तर दुसरीकडे मित्र गमावल्याचे दु:ख या जर्मन पर्यटकावर कोसळलं आहे.
बोट दुर्घटनेत पुण्याच्या चिमुकल्यासह आणखी एक केरळचा असलेला सहा वर्षीय चिमुकला बचावला आहे. या अपघातात त्यांचे आई-वडील बेपत्ता आहेत. दरम्यान या चिमुकल्याला उरणमधील जेएनपीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशांनी अंगावर काटा आणणारे अनुभव सांगितले. मुंबई उपनगरातील कुर्ला परिसरात राहणाऱ्या वैशील अडकणे या आपल्या 14 महिन्यांचा मुलगा आणि कुटुंबीयांसह एलिफंटा लेणी पाहण्यासाठी गेल्या होत्या. बोट बुडायला लागल्यानंतर वैशाली यांच्या भावाने त्यांच्या लहान मुलाला आधी हातावर उचलून धरले आणि नंतर खांद्यावर बसवले. त्यामुळे इतर बोटी येईपर्यंत हे लहान बाळ आणि त्याचे कुटुंबीय तग धरु शकले.
वैशाली अडकणे यांनी या सगळ्या प्रकाराविषयी माहिती देताना सांगितले की, आम्ही कुटुंबातील आठजण सुट्टी असल्यामुळे एलिफंटाला फिरायला चाललो होतो. आम्ही बोटीत बसून 40 ते 50 मिनिटं झाली असतील तेव्हा एक पांढऱ्या रंगाची स्पीडबोट अत्यंत वेगाने येऊन आमच्या बोटीला धडकली. त्या धक्क्याने आम्ही जागेवरच पडलो. त्यावेळी स्पीडबोटमधील एकजण उडून आमच्या बोटीवर पडला होता. तो जवळपास मेला होता. स्पीडबोटमधील दुसरा व्यक्तीनेही जवळपास जीव सोडला होता. सुरुवातीला आम्हाला वाटले काही झाले नाही. मात्र, स्पीडबोटने टक्कर दिल्याने आमच्या बोटीला भोक पडल्याचे काहीवेळाने लक्षात आले. तेव्हा आमच्या बोटीचा ड्रायव्हर लाईफ जॅकेट घाला, असे ओरडायला लागला. माझ्या भावाने आम्हा सगळ्यांना लाईफ जॅकेट दिले ते आम्ही घातले. त्यानंतर बोट एका बाजूला कलंडली आणि हळूहळू बुडत गेली. काहीजण बोटीखाली सापडले तर काहीजण वाहत गेले. आम्हीही जगण्याची आशा जवळपास सोडली होती. मात्र, लाईफ जॅकेटमुळे आम्ही वाचलो.
हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
धक्कादायक! एलिफंटाला ८० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली…
खांबोली तलावात फर्ग्युसन महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी बुडाले
हृदयद्रावक! जळगावमध्ये तीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू…
उजनी धरणात बोट उलटल्याने पाच जण बुडाले…
हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…
अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…

