पत्नीला घरामध्ये एका व्यक्तीसोबत पाहून नवरा संतापला अन्…

मुंबई : एका व्यक्तीने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर आरोपीनं पत्नीचा मृतदेह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या वाहनातून भावाच्या घरी नेला आणि खोटा मृत्यूचा दाखला बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

ईस्माईल अब्दुल कयुम (वय 24, रा. वसई पूर्वे) याचे नुकतेच खुर्शिदा खातून (वय 21) हिच्या सोबत लग्न झाले होते. ईस्माईल पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. बुधवारी ईस्माल घरी आला असता पत्नीला एका व्यक्तीसोबत पाहिले. त्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी ईस्माईल याने ओढणीने खुर्शिदाचा गळा आवळून हत्या केली.

पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह खासगी वाहनात टाकून नवजीवन येथे राहणाऱ्या भावाकडे घेऊन आला. पत्नीची हत्या दडवण्यासाठी ईस्माईल याने बनाव रचला. तिच्या पोटात दुखत असल्याने मृत्यू झाल्याची खोटी माहिती त्याने पत्नीच्या पुण्यात राहणाऱ्या भावाला दिली. दरम्यान, डॉक्टरांकडून बनवाट मृत्यू दाखला ही बनविण्याचा प्रयत्न करू लागला.

खुर्शिदाचा भाऊ मोहम्मद चौधरी घरी आला. मात्र, आपली बहीण आजारी नव्हती मग अचानक तिच्या पोटात कसं दुखू लागले आणि पोटाच्या दुखण्याने मृत्यू कसा झाला? याबाबत त्याला संशय आला. त्यामुळे त्याने मृतदेहाच्या शवविच्छेदनाची मागणी केली. याच काळात मृत्यू दाखला बनवणाऱ्या डॉक्टरांनीही संशय व्यक्त केला आणि ही बाब पेल्हार पोलिसांना समजली. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली, असता ईल्माईल याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले. हत्या नायगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्याने आरोपीला नायगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पेल्हार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली. आरोपी ईस्माईल कयुम आणि त्याचा भाऊ मुश्ताक कयुम या दोघांना हत्येच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती नायगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…

पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…

घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…

चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…

नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…

डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!