हृदयद्रावक! फलटणमधील पिता-पुत्र जेवण करून झोपले अन्…

सातारा : फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर औषध घेऊन जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हनुमंतराव रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोघांच्या मृत्यूचं नेमके कारण समजू शकलेले नाही.

वडील हनुमंतराव आणि त्यांच्या मुलाने कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हनुमंतराव, मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. पहाटे हनुमंतराव पोतेकर आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी अमित पोतेकर यांचे निधन झाले. त्यांच्या मुलीची तब्येत सुधारली आहे. विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या पिता पूत्रांच्या आकस्मित मृत्यूने संपूर्ण फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली असून, पुढील तपास ते करत आहेत. वडील आणि मुलाचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच समजू शकेल. पण, दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!