महिलेचा कमरेखालचा मृतदेह अन् जवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली…

सातारा: फलटण तालुक्यातील वीडणी गावामध्ये एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या मृतदेहाजवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली, सुरा आढळून आल्याने हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रदीप जाधव यांच्या शेतात हा शुक्रवारी (ता. १७) सकाळी मृतदेह आढळून आल्याने तात्काळ पोलिसांना माहिती कळवली. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी हा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस महिलेच्या कमरेवरील भागाचा शोध घेत आहेत. मृतदेहाजवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली, सुरा आढळून आल्यानं हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. तसेच आसपासच्या परिसरात मिसिंगच्या केसेस आहेत त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी देखील पोलिस बोलवत आहेत.

प्रदीप जाधव यांचे हे शेत गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे. उसाची तोडणी सुरू असताना हा सर्व प्रकार समोर आला आहे. निर्मनुष्य अशा ठिकाणी महिलेच्या कमरेच्या खालचा भाग पोलिसांना सापडला आहे. परंतु कमरेच्या वरचा भागाचा पोलिस शोध घेत आहेत. या अज्ञात महिलेचा शोध घेतला जात आहे. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. रात्री एक वाजेपर्यंत पोलिस तपास करत होते. आज सकाळपासून पुन्हा एकदा ऊस तोडणीला सुरुवात केली आहे. महिलेचे कोणते अवयव सापडतात का, याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…

धक्कादायक! भोंदूबाबाने अंड्यातून काढला खिळा अन् मृतदेहाचा केला सौदा…

धक्कादायक! पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली; मृतदेह अन् सोबत मिळाली चिठ्ठी…

पोलिस असलेल्या वर्गमित्राने मैत्रिणीची हत्या केली अन् मृतदेह…

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!