प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर नवऱ्याने पत्नीला विजेचा शॉक देऊन मारल्याची धक्कादायक घटना रायबरेली येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती रामविलास याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पत्नीला विजेचा शॉक दिल्यानंतर प्रियकरालाही शॉक देणार होता. पण घटनास्थळावरून तो पळून गेल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. नाही तर त्याची देखील हत्या करण्याचा विचार आरोपी रामविलासच्या मनात होता. रामविलासने सोमवारी रात्री आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते. चिडलेल्या रामविलास याने दोघांना वेगवेगळ्या खोलीत बंद केले आणि पत्नीला विजेचा शॉक दिला. यामुळे ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला मारहाण देखील केली त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. यावेळी महिलेच्या प्रियकराने घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपी रामविलासच्या शेजारच्यांनी सांगितले की, ‘सोमवारी मध्यरात्रीच्या वेळी घरातून ओरडण्याचे आवाज येत होते. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ज्यावेळी काही शेजारच्यांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा रामविलासच्या हातात एक लांब वायर आणि वेल्डिंगचा रॉड होता. त्याची पत्नी मृत अवस्थेत खाली पडली होती.’

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी रामविलास वेल्डिंगचे काम करतो. तो रात्री उशिरा येत असल्यामुळे त्याचा गैरफायदा पत्नी घेत होती, असे रामविलासचे म्हणणे आहे. तिच्या अनैतिक संबंधांमुळेच पत्नीवर जीव गमावण्याची वेळ आली असल्याचे रामविलासने पोलिसांना सांगितले.

क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…

Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…

प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!