घाटंजी येथे विधी सेवा समितीतर्फे विधी साक्षरता शिबिर संपन्न…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे, सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातर्फे घाटंजी येथे 10 डिसेंबर 2023 रोजी घाटी येथील नगर परिषद शाळेत ‘लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा, 2012 संदर्भात’ विधि साक्षरता शिबिर संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी येथील विधी सेवा समितीचे अध्यक्ष, दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात हे होते. तर विशेष अतिथी म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर, घाटंजी तालुका विधिज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, सचिव ॲड. सादीक खान, पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण लिंगाडे आदीं उपस्थित होते.

घाटंजी येथील विधि साक्षरता शिबिरात घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात, न्यायाधिश ए. ए. कळमकर, विधिज्ञ तसेच पोलिस अधिकारी आदींनी ‘लैंगिक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा, 2012 संदर्भात’ विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात नगर परिषद शाळा क्रमांक 3 चे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, शाळेचे कर्मचारी तसेच घाटंजी येथील न्यायालयीन कर्मचारी आदीं उपस्थित होते.

यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…

यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…

धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…

आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे; असे म्हणून शासकीय कामात अडथळा…

सरपंचाने केला शौचालयास गेलेल्या महिलेचा विनयभंग…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!