
प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…
नागपूर : नागपूरच्या धंतोली येथील ‘न्यूरॉन’ हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टरने इंजेक्शन देऊन स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांनी स्वत:ला भूलीचं इंजेक्शन देऊन आयुष्याचा शेवट केला आहे. कौटुंबिक तणावातून डॉक्टरांनी हे टोकाचं पाऊल उचल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियमजवळील न्युरॉन्स मेंदू उपचार रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून चांदेवार कार्यरत होते. सकाळी सहा वाजता ते रुग्णालयात दाखल झाले अन् त्यानंतर त्यांनी इंजेक्शन घेऊन आयुष्य संपवले.
View this post on Instagram
डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार सकाळी नियमित कामकाज केल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले आणि तेथे अतिरिक्त मात्रेत भुलीचे इंजेक्शन घेतल्याने बेशुद्ध पडले. सकाळी 9 च्या सुमारास इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन केला पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना उठवण्यासाठी त्यांची रुम नंबर 408 मध्ये प्रेवश करण्याचा प्रयत्न केला. दरवाजा तोडल्यानंतर पाहिलं तर डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत होते अन् त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना आयसीयुमध्ये शिफ्ट करण्यात आले.
आयसीयुमध्ये शिफ्ट करण्यात आल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रुमची तपासणी केली असता तिथं त्यांना काही इंजेक्शन सापडले. यामध्ये त्याने भुलीचं इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोणतीही चिट्ठी आढळलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे ते तणावाखाली होते. पोलिसांनी त्यांचा मोबाईल ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…
पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
पुणे शहरातील ‘रुबी हॉल’मधील डॉक्टरची आत्महत्या; मोबईलचा पासवर्ड…
महिला डॉक्टरने तणाव आणि निराशेतून केली आत्महत्या…
धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

