
हृदयद्रावक! स्नेहसंमेलनामध्ये गाणं म्हणत असतानाच सर कोसळले अन्…
कोल्हापूर : माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये गाणे गात असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सर व्यासपीठावरून गाणं म्हणत असतानाच असा भयावह प्रसंग घडल्याने क्षणात कार्यक्रमात शोककळा पसरली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या ठिकाणी ही घटना घडली आहे. विनायक सखाराम कुंभार (वय 78) असे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. शिरोळ तालुक्यातील उदगाव या ठिकाणी 2001-2002च्या दहावीच्या बॅचने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. शंभरहून अधिक विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी निवृत्त शिक्षकांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.
माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदरचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याचवेळी कुंभार सर भाषणाला उभा राहिले. मनोगत व्यक्त करत असताना गीत गाण्यास सुरुवात केली. इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे हे गाणे म्हणत असताना कुंभार सरांना अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. मनोगत व्यक्त करत असलेल्या ठिकाणीच कुंभार सर कोसळले. विद्यार्थ्यांनी उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच सरांचा मृत्यू झाला होता. या सगळ्या घटनेने माजी विद्यार्थ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सरांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…
हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…
हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये भावासमोरच बहिणीने सोडला प्राण…
हृदयद्रावक! मुलगी IAS झाल्याचे पेढे वाटताना वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू…

