नागपूर हादरलं! कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत जागेवरचं संपवलं…

नागपूर: नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगर पुलिया परिसरात गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय 30) याची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

समीर शेख याच्यावर परिमंडल क्रमांक 5 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, मारहाण, एमपीडीएस अधिनियमासह तब्बल 31 हून अधिक गुन्हे नोंद होते. तो गांजाची तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता, त्यामुळे परिसरात त्याची दहशत होती. गुरुवारी पहाटे समीर शेख मोमिनपुरा येथील सासुरवाडीतून परतत असताना त्याच्यावर हल्ला झाला. अशु नावाच्या गुन्हेगाराने आपल्या टोळीच्या मदतीने समीरवर कोयते आणि बेसबॉल बॅटने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी समीर शेखचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी अशु आणि त्याच्या टोळीचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

दरम्यान, या हत्येमागे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्वाचा संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. समीर शेख आणि अशु यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता, ज्याचे रूपांतर अखेर या भयंकर हत्येत झाले. सध्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…

गडचिरोली! पहाटे फिरायला गेलेल्या 6 मुलांना भरधाव ट्रकनं चिरडलं; पाहा नावे…

पुणे! Z ब्रीजजवळ भडकलं टोळीयुद्ध, कोयत्याने प्राणघातक हल्ला…

नागपूर! एकाच कुटुंबातील 5 जणांचे पाण्यात आढळले मृतदेह…

नागपूर दुहेरी हत्याकांडाने हादरलं; घरातील रॉडने हल्ला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!